लाल गाऊन, हाय-स्लिट अन् शॉर्ट हेअरकट; 'नॅशनल क्रश' गिरिजा ओकचा नवा अवतार पाहिलात?
Mayuri Gawade
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले सध्या चाहत्यांकडून ‘नॅशनल क्रश’ म्हणून चर्चेत आहे.
नुकतेच गिरिजाने सोशल मीडियावर तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोशूटचे काही फोटो शेअर केले असून तिचा हा बदललेला अंदाज लगेचच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या लूकसाठी गिरिजाने गडद लाल रंगाचा फुल-स्लीव्ह गाऊन निवडला असून त्याच्या डीप व्ही-नेकमुळे संपूर्ण लूकला बोल्ड टच मिळाला आहे.
गाऊनच्या मध्यभागी दिलेला सबटल शिमर डिटेल आणि स्लीक फिटिंग यामुळे गिरिजाचा लूक ग्लॅमरस दिसतो, पण तो ओव्हर-द-टॉप वाटत नाही.
हाय-स्लिट डिझाइनमुळे गिरिजाच्या रेड गाऊन लूकला आणखी स्टायलिश एज मिळाली असून फुल-लेंथ फोटोंमध्ये हा डिटेल विशेष उठून दिसतो.
मिनिमल ज्वेलरी, सॉफ्ट आय मेकअप आणि न्यूड-टोन्ड लिप्समुळे संपूर्ण फोकस गिरिजाच्या रेड गाऊन आणि तिच्या एक्स्प्रेशन्सवर राहतो.
गिरिजाचा शॉर्ट आणि व्हॉल्युमिनस हेअरकटही या फोटोशूटमध्ये विशेष लक्ष वेधून घेत असून चाहत्यांना तिचा हा फ्रेश लूक खूप पसंत पडत आहे.
मराठी, हिंदी आणि कन्नड सिनेसृष्टीपासून ओटीटीपर्यंत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या ‘नॅशनल क्रश’ गिरिजाने या नव्या ग्लॅमरस लूकने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे. | सर्व छायाचित्रे : गिरिजा ओक| इंस्टाग्राम