Girija Oak : मराठमोळी अभिनेत्री झाली एका रात्रीत 'नॅशनल क्रश'; निळ्या साडीतील फोटो व्हायरल
Mayuri Gawade
अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. | सर्व छायाचित्र : इंनस्टाग्राम (girijaoakgodbole)
तिच्या निळ्या साडीतील फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
चाहत्यांनी तिला थेट “नॅशनल क्रश” म्हटले आहे.
तिच्या फोटोंवर हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
तिच्या साध्या, मोहक आणि आकर्षक लूकने नेटिझन्स वेडे झाले आहेत.
अनेक यूजर्स तिचे फोटो शेअर करून “ही कोण आहे?” असा प्रश्न विचारताना दिसले.
काही वेळातच सर्वांना कळलं की ती दुसरी तिसरी नाही, तर मराठी अभिनेत्री गिरिजा ओकच आहे.
गिरिजाने मराठीसोबतच हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
तिच्या या फोटोंमुळे ती तरुणाईंची “नॅशनल क्रश” बनली आहे.
सध्या सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रशंसा आणि प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय.