Girija Prabhu Photos : धनत्रयोदशीला गिरिजा प्रभूचा मराठमोळा साज; पारंपरिक दागिन्यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

किशोरी घायवट-उबाळे

दिवाळीच्या उत्साहाला सुरुवात झाली असून आज, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा सण सर्वत्र आनंदात साजरा केला जात आहे.
या मंगलमय सणानिमित्त अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने खास पारंपरिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गिरिजाच्या या लूकमध्ये मराठमोळ्या संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.
गळ्यात पारंपरिक दागिने आणि त्यासोबत मोत्यांची माळ घालून तिने आपला लूक अधिक खुलवला आहे.
नाकातील नाजूक नथ आणि कानातील आकर्षक झुमके तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
पारंपरिक दागिन्यांचा हा साज गिरिजाला एक खास आणि देखणं रूप देत आहे.
तिच्या या मंगलमय आणि पारंपरिक लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने शेअर केलेले गिरिजाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.