पैठणी, नथ आणि साजशृंगार; गिरिजा प्रभूची पैठणीतली खास अदा
Krantee V. Kale
मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव 'कोण होतीस तू' या मालिकेत एकत्रित भूमिका करत आहेत. ही त्यांची एकत्रित दुसरी मालिका आहे.
| फोटो - स्टार प्रवाह
या मालिकेत गिरिजा प्रभू ही कावेरी तर मंदार हा यशच्या रूपात दिसत आहे. या मालिकेतील वटपौर्णिमा हे दोघे साजरी करताना दिसत आहे. ही त्यांची मालिकेतील दुसरी वटपौर्णिमा आहे.
| फोटो - स्टार प्रवाह
यावेळी कावेरीने लालसर गुलाबी रंगाची मुनिया पैठणी परिधान केली आहे. तिच्या नाकातल्या 'अहो'च्या नथीने लक्ष वेधले आहे. | फोटो - स्टार प्रवाह
या आधी हे दोघेजण 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेत झळकले होते. यामध्ये गिरिजाने गौरी म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती.
| फोटो - स्टार प्रवाह
सुख म्हणजे नक्की काय असतं नंतर कोण होतीस तू या मालिकेतील दोघांची जोडी पुन्हा एकदा शोभून दिसत आहे. | फोटो - स्टार प्रवाह