Home Decor Tips : घराला द्यायचाय हटके आणि क्लासी लुक? तर मग 'या' टिप्स नक्की फोलो करा

Mayuri Gawade

आपले घर हे आपल्यासाठी नेहमीच आरामदायी आणि प्रिय असते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
कितीही प्रवास किंवा विदेशी ट्रिप्स केल्या तरी काही दिवसांनी आपल्याला घराची आठवण ही येतेच.
त्यामुळे आपले हे घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि पॉश दिसावे यासाठी काही सोप्या डेकोर टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
पेस्टल रंग वापरा - मिंट ग्रीन, लिलाक किंवा लॅव्हेंडर शेड घराला पॉश आणि मोठे दिसवतात.
लेयरड पडदे लावा - दोन थरांचे पडदे (घन आणि निखळ) खोलीत सौंदर्य आणि प्रकाश नियंत्रित करतात.
रग्ज/कार्पेट वापरा - सोफा किंवा सेंटर टेबलखाली रग्ज ठेवल्याने खोलीचा लूक लगेच बदलतो.
ऐक्सेंट खुर्च्या ठेवा - रंगीत किंवा प्रिंटेड विंग चेअर खोलीत पॉप कलर आणि स्टाइल आणतात.
स्टायलिश प्लांटर्स निवडा - रोपांची भांडी सिरॅमिक, ज्यूट किंवा मेटॅलिकमध्ये ठेवल्याने घराला दर्जेदार लूक मिळतो.