महागडे काचेचे ग्लास झाले मळकट? एका मिनिटात चमकतील, करा 'हे' उपाय
Mayuri Gawade
काचेच्या भांड्यांवर पडलेले पांढरे डाग, चिकट थर आणि ओरखडे पाहून अनेकजण त्रस्त होतात.
मात्र घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने ही भांडी पुन्हा नव्यासारखी चमकवता येऊ शकतात.
कोमट पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळून ग्लास १५ ते २० मिनिटे भिजत ठेवल्यास पाण्याचे डाग निघण्यास मदत होते.
चहा, कॉफी किंवा तेलाचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांची पेस्ट वापरू शकता.
मऊ स्पंजने हलक्या हाताने स्वच्छता केल्यास काचेवर ओरखडे पडत नाहीत.
अरुंद बाटल्या किंवा ग्लास स्वच्छ करण्यासाठी तांदूळ, मीठ आणि कोमट पाण्याचा उपाय प्रभावी ठरतो.
बटाट्याच्या सालींमधील स्टार्च काचेवरील पिवळसर आणि चिकट थर दूर करण्यास मदत करतो.
हलके ओरखडे कमी करण्यासाठी काचेवर थोडी पांढरी टूथपेस्ट लावून कापडाने घासू शकता.
या सोप्या उपायांमुळे काचेची भांडी पुन्हा नव्यासारखी स्वच्छ आणि चमकदार दिसू शकतात. | All Images : AI generated