गोकुळाष्टमीला घरी दही लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Mayuri Gawade
गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी बाजारासारखे घट्ट, मलाईदार दही घरीच लावायचे असेल तर दूध आणि विरजणाची योग्य पद्धत महत्त्वाची आहे.
दही घट्ट लागण्यासाठी शक्यतो फुल क्रीम किंवा म्हशीचे दूध वापरा आणि दूध मध्यम ते मंद आचेवर काही मिनिटे चांगले उकळून घ्या.
दूध उकळल्यानंतर ते थेट विरजण लावू नका; दूध कोमट म्हणजे साधारण ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाचे असताना विरजण घाला.
दही लावण्यासाठी मातीचे भांडे वापरल्यास त्यातील अतिरिक्त ओलावा शोषला जाण्यास मदत होते आणि दही अधिक घट्ट होऊ शकते.
एक लिटर कोमट दुधासाठी साधारण एक ते दीड चमचा ताजे दही विरजण म्हणून पुरेसे असते, त्यामुळे विरजणाचे प्रमाण जास्त ठेवू नका.
विरजण थेट दुधावर टाकण्याऐवजी आधी ते व्यवस्थित फेटून घ्या आणि नंतर संपूर्ण दुधात एकजीव होईपर्यंत मिसळा.
विरजण लावल्यानंतर दह्याचे भांडे वारंवार हलवू नका आणि ते उबदार, स्थिर जागी काही तास सेट होण्यासाठी ठेवा.
विरजण उपलब्ध नसेल तर कोमट दुधात देठासह हिरवी मिरची ठेवण्याची घरगुती पद्धत काही ठिकाणी वापरली जाते, मात्र याचा परिणाम प्रत्येक वेळी सारखा असेलच असे नाही.
दही साधारण सहा ते आठ तासांत जमल्यानंतर ते एक-दोन तास फ्रिजमध्ये ठेवल्यास दही अधिक घट्ट होण्यास आणि आंबटपणा वाढणे थांबण्यास मदत होऊ शकते. | All Photos : AI Generated