विजयीवीरांचे देवदुर्लभ स्वागत! बघा सेलिब्रेशनचे Photo

Tejashree Gaikwad

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. | ANI
अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात केली. १७ वर्षांनी प्रथमच भारताने ही स्पर्धा जिंकली, तर २०१३ नंतर त्यांचे हे पहिलेच आयसीसी जेतेपद ठरले. | REUTERS and AFP
गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ दुपारी ३च्या सुमारास मुंबईसाठी रवाना झाला. | @ICC/X
@ICC/X
मुंबई विमानतळावर आमगन झाल्यावर भारतीय संघाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. | X
१७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून मायदेशी परतलेल्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे देवदुर्लभ स्वागत करण्यासाठी गुरुवारी मुंबईतील मरिन ड्राइव्हवर लाखोंचा जनसागर उसळला. | @ICC/X
अखेर सायंकाळी ७.३०च्या नंतर दर्दी क्रीडाप्रेमींना विश्वविजेत्यांचे दर्शन झाले आणि अवघी मुंबापुरी जल्लोषात न्हाऊन निघाली. | @ICC/X
मुंबईंचा राजा रोहित शर्मा, इंडिया, इंडिया... बुम बुम बुमरा, विराट कोहली, यांसारख्या घोषणांनी तोपर्यंत संपूर्ण मरिन ड्राइव्ह दुमदुमून निघाला.
दुपारी ४ वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियम तसेच स्टेडियमबाहेरील रोडवर गर्दी करून बसलेल्या चाहत्यांवर वरुणराजाही बरसला. | @ICC/X