भाजीचा रस्सा पातळ होतो? या २ गोष्टी वापरा, चव होईल जबरदस्त

किशोरी घायवट-उबाळे

रस्सा पातळ होतोय? भाजीचा रस्सा पातळ झाला तर चव फिकी वाटते. पण काही सोप्या किचन ट्रिक्स वापरून रस्सा दाटसर, रिच आणि हॉटेलसारखा चविष्ट बनवता येतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
१ ते २ टीस्पून बेसन हलक्या आचेवर कोरडे भाजून घ्या. ते रस्स्यात घातल्यास रस्सा लगेच दाट होतो आणि चवही छान लागते.
काजू आणि मगज बीयांची पेस्ट -१० ते १२ काजू आणि १ ते २ टीस्पून मगज बी (Melon Seeds) ३० मिनिटे भिजत ठेवा. यानंतर त्यांची स्मूद पेस्ट करून रस्स्यात मिसळा.
रस्स्याला मिळेल क्रीमी टेक्स्चर : काजू आणि मगज बीयांची पेस्ट घातल्याने रस्सा फक्त दाटच होत नाही, तर त्याला क्रीमी आणि रिच टेक्स्चरही येतो.
हॉटेलसारखी चव - या दोन गोष्टींमुळे रस्स्याची चव अधिक बॅलन्स होते. घरच्या साध्या भाजीचाही रस्सा हॉटेलसारखा लागतो.
कोणत्या भाज्यांसाठी उपयोगी? ही ट्रिक पनीर, मिक्स व्हेज, कोफ्ता, शाही भाजी, मलाई कोफ्ता किंवा कोणत्याही ग्रेव्ही बेस्ड भाज्यांसाठी वापरता येते.
लक्षात ठेवा ही टिप - रस्सा दाट करताना एकदम जास्त बेसन किंवा पेस्ट घालू नका. थोडं-थोडं घालत ढवळा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि चवही बिघडणार नाही.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)