केस पांढरे होत आहेत?तर करून पहा 'हे' घरगुती उपाय

Swapnil S

बदामाच्या तेलामध्ये आवळ्याचा रस टाकून डोक्याला रोज लावल्यानं पांढरे केस काळे होतात. | PM
आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि १० मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा ही डोक्याला लावा. | PM
पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहापत्ती टाका. पाणी थंड झाल्यावर या पाण्यानं केस धुवा. पण यानंतर शॅम्पू लावू नका. | PM
नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या १० मिनीटं आधी या तेलानं डोक्याची मालिश करा. | PM
मेहंदी पावडर आणि दह्याचं समान मिश्रण एकत्र करून केसांचा मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. | PM
दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो. | PM