नुसता दुधाचा चहा पिणे हे स्वास्थ्याला हानिकारक असू शकतो. तसेच आज आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याने अनेक जण चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे वळले आहेत. वाचा अधिक -
https://marathi.freepressjournal.in/lifestyle/do-you-also-like-tea-only-with-milk-know-the-side-effects
त्यापैकीच एक ग्रीन टी. ग्रीन टी हा विशेष करून वजन कमी करण्यासाठी घेतला जातो. ग्रीन टीमुळे मेटाबोलिझम वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. | Freepik
आवळा चहा हा देखील खूप आरोग्यदायी असतो. दुधाचा चहा आणि ग्रीन टीला आवळा टी उत्तम पर्याय आहे. वाचा अधिक - https://marathi.freepressjournal.in/lifestyle/alternative-to-green-tea-drink-it-daily-and-reap-many-health-benefits | संग्रहित छायाचित्र
मिक्स हर्ब टी हा देखील चहाचा लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये एका पेक्षा जास्त वनस्पती किंवा त्यांचे घटक असतात. त्यामुळे त्याचे आरोग्याला विविध फायदे मिळतात. | Freepik
काळा किंवा कोरा चहात लिंबू पिळून केलेला चहाला लेमन टी म्हणतात. हा चहा खूप आरोग्यदायी असतो. सातत्याने जुलाब होत असल्यास लेमन टी पिल्याने तातडीने फरक पडतो. मात्र, सातत्याने लेमन टी पिल्यास बद्धकोष्ठाचा त्रास जाणवू शकतो. | Freepik
गुळाचा चहा : साखरेला पर्याय म्हणून गुळाचा चहा पिला जातो. गुळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिला जातो. | freepik
कोरा चहा किंवा काळा चहा : दुधाच्या चहा ऐवजी कोरा चहा किंवा काळा चहा हा जास्त आरोग्यदायी असतो. मात्र, याचे प्रमाण देखील नियंत्रित असावे. सातत्याने चहा पिणे हानिकारकच असते. | freepik
काश्मिरी कहावा सध्या लोकप्रिय होत आहे. काश्मीरच्या खास केसरसह ११ मसाल्यांपासून हा कहावा बनवला जातो. जो खूपच चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. अधिक वाचा - https://marathi.freepressjournal.in/lifestyle/how-to-make-kashmiri-kahva-what-are-the-benefits | FeePik