हिरवी, पिवळी, लाल... कोणती ढोबळी मिरची सर्वाधिक पौष्टिक? जाणून घ्या नेमका फरक
Mayuri Gawade
बाजारात मिळणारी हिरवी, पिवळी आणि लाल ढोबळी मिरची दिसायला वेगळी असली तरी त्यांच्या चवीपासून पोषणमूल्यांपर्यंत अनेक गोष्टी वेगळ्या असतात.
'शिमला मिरची' हे नाव भारतात कसं पडलं माहिती आहे का? ब्रिटिशांनी ही भाजी भारतात आणल्यानंतर शिमला परिसरात तिची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाली.
हिरवी ढोबळी मिरची पूर्ण पिकण्यापूर्वीच तोडली जाते. त्यामुळे तिची चव थोडी कडवट असते आणि किंमतही इतर रंगांच्या तुलनेत कमी असते.
हिरव्या ढोबळी मिरचीमध्ये कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन C भरपूर असल्याने भारतीय भाज्या, पनीर, नूडल्स आणि चायनीज पदार्थांमध्ये तिचा सर्वाधिक वापर केला जातो.
पिवळी ढोबळी मिरची हिरव्या मिरचीपेक्षा अधिक पिकलेली असल्याने तिची चव हलकी गोड असते आणि ती पदार्थांना आकर्षक रंगही देते.
व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C ने समृद्ध असलेली पिवळी ढोबळी मिरची डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे सलाड आणि पास्तामध्ये तिचा वापर अधिक केला जातो.
लाल ढोबळी मिरची झाडावर सर्वाधिक काळ राहिल्याने पूर्णपणे पिकते. त्यामुळे तिची चव अधिक गोड, रसदार आणि किंमतही तुलनेने जास्त असते.
लाल ढोबळी मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर व्हिटॅमिन C असल्याने ती रोगप्रतिकारशक्ती, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानली जाते.
कमी कॅलरी हवी असेल तर हिरवी, संतुलित पोषणासाठी पिवळी आणि सर्वाधिक पोषणमूल्यांसाठी लाल ढोबळी मिरची हा उत्तम पर्याय ठरू शकतो. | All Photos : AI Generated