घरातल्या कुंडीतच वाढवा बहुगुणी कढीपत्ता; रोप तयार करण्यासाठी काय घ्याल काळजी?

Kkhushi Niramish

कढीपत्ता हा बहुगुणी आहे. अनेक जण घरातच कुंडीत याची वाढ करतात. जेणेकरून स्वयंपाकासाठी कढीपत्ता पाहिजे तेव्हा वापरता येईल. मात्र, अनेक वेळा कुंडीत कढीपत्त्याचे रोप लागत नाही. इथे रोप तयार करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ. | All Photo - Urban Gardening You Tube screenshot
सर्वप्रथम कढीपत्त्याला लागलेली अशी काळसर छोटी फळे तोडून घ्या.
यामधून हिरव्या रंगाचे बीज वेगळे करा.
रोप तयार करण्यासाठी माती उत्तम हवी. बागेतील उत्तम माती घेऊन लावा.
मातीत थोड्या थोड्या अंतरावर छोटे गोल खड्डे करा. त्यात आधीच काढलेले हिरवे बीज रोवून घ्या.
त्यावर माती घाला. या मातीवर हलकेच पाणी घाला.
नंतर दररोज किमान १५ दिवस कुंडी भरेल इतके पाणी घाला.
सामान्यपणे १२ ते १५ दिवसांनी अशा प्रकारे अंकूर फुटेल.
साधारण ३० ते ३५ दिवसात असे छान कढीपत्त्याचे रोप तयार होईल
दररोज पाणी आणि खत घालून योग्य काळजी घेतल्यास १६० ते १८० दिवसात कढीपत्त्याच्या झाडाची पूर्ण वाढ होईल.