Gudi Padwa 2025 : गुढी पाडव्याला घरच्या घरी दह्यापासून पारंपारिक पद्धतीने बनवा केसर श्रीखंड; जाणून घ्या रेसिपी
Kkhushi Niramish
दह्यापासून पारंपारिक पद्धतीने केसर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम सुती कापडात मलाईदार दही घ्या. | All Photo - You Tube MadhurasRecipe Marathi
या दह्यातील संपूर्ण पाणी निथळण्यासाठी त्याला बांधून ठेवा. एक एक थेंब पाणी निथळून जाईपर्यंत थांबा.
दह्यातून निघालेले पाणी प्रोटीनयुक्त असते. हे पाणी तुम्ही कडी बनवण्यासाठी वापरू शकता.
जोपर्यंत दह्यातून पाणी निथळत आहे तोपर्यंत एक छोटी वाटी दूधात केसर घालून ठेवा.
दह्यातून सर्व पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे छान चक्का तयार होतो.
हा चक्का चाळणीतून हाताने स्मॅश करून गाळून घ्या.
चाळणीतून चक्का गाळून घेण्याची प्रोसेस हळूहळू करा. श्रीखंड स्मूथ होण्यासाठी हे आवश्यक आहे. शक्यतो मिक्सरचा वापर टाळा. गाळणीतूनच करून घ्या.
मऊ चक्क्यामध्ये केसर घातलेले दूध घाला.
हे मिश्रण चमच्याने छान फेटून घ्या. सोबतच इथे बारीक केलेली पीठी साखर घाला.
साखर विरघळेपर्यंत श्रीखंड फेटत राहा.
सरते शेवटी श्रीखंडमध्ये पिस्ता, विलायची घाला. आवडत असल्यास गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता.