Gudi Padwa 2026 : गुढी पाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

किशोरी घायवट-उबाळे

गुढी पाडवा कधी आहे? यंदा गुढी पाडवा १९ मार्च यादिवशी साजरा केला जाणार असून हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
मराठी नववर्षाची सुरुवात - चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
गुढी का उभारतात? घराच्या दारात उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते.
श्रीरामांच्या विजयाशी संबंध - रामायणानुसार, भगवान राम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतले, त्या आनंदात गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.
शेतकऱ्यांसाठीही खास दिवस - गुढी पाडवा हा नवीन पीक, नवीन काम आणि शुभ सुरुवातीचा दिवस मानला जातो.
पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा सण - या दिवशी घराची साफसफाई करून गुढी उभारतात, रांगोळी काढतात आणि गोड पदार्थ बनवून सण साजरा करतात.
अनेक ठिकाणी गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्राही काढल्या जातात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)