Guru Purnima 2026 : महागडी भेट नको! 'या' छोट्या पण अर्थपूर्ण गोष्टींनी जिंका गुरूंचे मन
किशोरी घायवट-उबाळे
आवडते पुस्तक भेट द्या - गुरूंना त्यांच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक आणि त्यात हस्तलिखित संदेश देऊन ही भेट अधिक खास बनवा.
पर्सनलाइज्ड डायरी - नाव किंवा आद्याक्षरे असलेली आकर्षक डायरी भेट देऊन त्यांच्या आठवणींना जपण्याची संधी द्या.
आठवणींची फ्रेम - जुन्या फोटोचे सुंदर चित्र किंवा खास आठवणींसह तयार केलेली फ्रेम त्यांच्यासाठी कायमस्वरूपी स्मरणिका ठरेल.
रोपट्याची भेट - सुंदर कुंडीसह एखादे रोपटे भेट द्या. ते ज्ञान, प्रगती आणि नात्यातील जिव्हाळ्याचे प्रतीक आहे.
आवडीनुसार गिफ्ट बॉक्स - चहा, कॉफी, बागकाम, चित्रकला किंवा संगीत यांसारख्या त्यांच्या आवडीच्या वस्तूंचा खास हॅम्पर तयार करा.
कृतज्ञतेचे पत्र - गुरूंनी दिलेल्या शिकवणीबद्दल मनापासून आभार व्यक्त करणारे हस्तलिखित पत्र त्यांच्यासाठी अमूल्य ठरेल.
मोबाईलपासून दूर वेळ द्या - गुरुपौर्णिमेला काही तास मोबाईल बाजूला ठेवून फक्त त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा आणि आठवणींमध्ये रमून जा.
या सोप्या आणि अर्थपूर्ण गोष्टींमुळे तुमची गुरुपौर्णिमा आनंदात साजरी होऊ शकेल. | 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा