H1N1 चा वाढता संसर्ग; स्वाइन फ्लू टाळण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय
किशोरी घायवट-उबाळे
H1N1 म्हणजे काय? H1N1 हा Influenza A विषाणूचा एक प्रकार असून, तो श्वसनमार्गाशी संबंधित संसर्ग निर्माण करतो. | (सर्व छायाचित्र : Yandex)
ताप आणि खोकला ही सामान्य लक्षणे - H1N1 मध्ये ताप, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
सर्दी-नाक बंद होणे - नाक वाहणे किंवा बंद होणे, शिंका येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणेही जाणवू शकतात.
थकवा आणि अशक्तपणा - संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रचंड थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी जाणवू शकते.
हात स्वच्छ धुवा - साबण आणि पाण्याने नियमित हात धुवा. पाणी उपलब्ध नसल्यास अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरचा वापर करा.
खोकताना-शिंकताना तोंड झाका - खोकताना किंवा शिंकताना टिश्यू किंवा कोपराचा वापर करून नाक-तोंड झाका. वापरलेला टिश्यू लगेच कचरापेटीत टाका.
चेहऱ्याला वारंवार हात लावू नका - अस्वच्छ हातांवरील जंतू डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श केल्याने शरीरात प्रवेश करू शकतात.
आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवा - फ्लूसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या जवळचा अनावश्यक संपर्क टाळल्यास संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.
आजारी असाल तर घरीच राहा - ताप, खोकला किंवा इतर फ्लूसदृश लक्षणे असल्यास शाळा किंवा कामावर जाणे टाळा आणि इतरांपासून संसर्ग पसरण्याचा धोका कमी करा.
लसीकरण आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा - वार्षिक फ्लू लसीकरणामुळे प्रसारित होणाऱ्या इन्फ्लूएंझा विषाणूंपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः मुलांना किंवा अस्थमासारख्या आजार असलेल्या व्यक्तींना लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.