Bone health tips : सावधगिरी बाळगा! 'या' सवयींनी हाडे होतात कमजोर

Mayuri Gawade

हाडे मजबूत असली तरच शरीर तंदुरुस्त राहते. पण आपल्या काही सवयींमुळे हाडांची ताकद हळूहळू कमी होते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता हाडांना कमजोर करते, त्यातच आपण व्यायाम टाळतो तेव्हा हाडांची ताकद आणखी घटते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातून कॅल्शियम कमी होतं आणि कोल्ड्रिंक तसेच जास्त कॅफिन घेतल्याने हाडांवर थेट परिणाम होतो.
याशिवाय धूम्रपान व मद्यपान हाडांची घनता कमी करतात, तर जंक फूडमुळे आवश्यक पोषणच मिळत नाही.
सततचा तणावही हाडांना ठिसूळ करतो आणि त्यामुळे मोठं नुकसान होतं.
पण यावर सोपा उपाय म्हणजे आहारात दूध, दही, पालेभाज्या, फळे यांचा समावेश करणे आणि रोज सूर्यप्रकाश, योगासने तसेच व्यायाम करून हाडांना खऱ्या अर्थाने मजबूत ठेवणे.
हाडांची काळजी आत्ताच घेतली, तर पुढील आयुष्यात ऑस्टियोपोरोसिस आणि सांधेदुखीपासून बचाव करता येईल.
निरोगी सवयी अंगीकारल्या तर शरीर दीर्घकाळ सक्रिय आणि सक्षम राहील.