रबरबँडला विसरा! केस बांधताना स्क्रंची का ठरते फायदेशीर? जाणून घ्या
Mayuri Gawade
केसांची काळजी घेताना आपण शॅम्पू, तेल आणि हेअर केअर प्रॉडक्ट्सकडे लक्ष देतो; पण केस बांधण्यासाठी कोणते अॅक्सेसरी वापरतो, याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.
केस वारंवार घट्ट बांधणे, रबरबँडने केस आवळणे किंवा केस विंचरताना जास्त ओढणे यामुळे केसांवर अनावश्यक ताण येऊन ते तुटू शकतात.
केस बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घट्ट रबरबँडऐवजी मऊ आणि सैल स्क्रंची हा केसांसाठी तुलनेने आरामदायी पर्याय ठरू शकतो.
कापडी किंवा मऊ पोत असलेल्या स्क्रंचीमुळे केसांना होणारे घर्षण कमी राहू शकते, त्यामुळे केस बांधताना आणि स्क्रंची काढताना होणारी ओढ कमी होण्यास मदत होते.
स्क्रंचीच्या मदतीने पोनीटेल, अंबाडा किंवा साधी वेणी सहज बांधता येते आणि केसांना घट्ट आवळून न ठेवता हेअरस्टाइलही व्यवस्थित करता येते.
दिवसभर केस बांधून ठेवायचे असतील, तर मऊ स्क्रंचीचा वापर केल्याने डोक्याच्या त्वचेवर सतत ताण जाणवण्याची शक्यता कमी होऊ शकते.
रेशमी किंवा सॅटिनच्या स्क्रंचीचा वापर रात्री केस बांधण्यासाठी करता येतो, कारण मऊ पोतामुळे केसांमधील घर्षण कमी होण्यास मदत होऊ शकते.
रंगीत किंवा प्रिंटेड स्क्रंचीमुळे साध्या पोनीटेललाही मॉर्डन लुक मिळतो, जेणेकरुन स्टाईल आणि काळजी दोन्ही साधता येते..
स्क्रंची मऊ असली तरी ती खूप घट्ट बांधणे टाळा; केसांना अधूनमधून मोकळे सोडा आणि केसांच्या प्रकारानुसार योग्य आकाराचा, मऊ व स्वच्छ स्क्रंची वापरा. | सर्व छायाचित्रे 'एआय'ने बनविलेली आहेत.