Hair Care Tips : दिवसभर केस बांधून ठेवता? मग या ७ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Mayuri Gawade
आपल्यापैकी अनेकजणी केस नेहमी बांधून ठेवतात. कधी वेणी, तर कधी आंबाडा घालून. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
पण सतत केस बांधून ठेवल्याने स्काल्प आणि केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
केस बांधताना रबर बँड वापरू नका, त्याऐवजी कापडी किंवा सॅटिन रबर बँड वापरा.
केस ओढून किंवा घट्ट बांधू नका, यामुळे केस तुटतात आणि मुळांवर ताण येतो.
भांग नेहमी एकाच दिशेने पाडू नका; काही दिवसांनी दिशेत बदल करा.
केसांच्या टोकांना नियमितपणे हेअर सीरम किंवा तेल लावा, जेणेकरून ते कोरडे पडणार नाहीत.
ओले केस बांधू नका, आधी पूर्ण सुकवून मगच बांधा.
दिवसात काही तास तरी केस मोकळे ठेवा, यामुळे स्काल्पवरील ताण कमी होतो.
झोपताना केस मोकळे ठेवू नका, यामुळे गुंता वाढतो; लूज वेणी किंवा बन करा.
या छोट्या सवयींचा अवलंब केल्यास केस गळणे, तुटणे आणि निस्तेज होणे टाळता येते आणि केसांचे सौंदर्य टिकून राहते.