केस धुण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते नुकसान; 'या' गोष्टी ठेवा लक्षात

किशोरी घायवट-उबाळे

खूप गरम पाण्याने केस धुणे - गरम पाणी केसांचा नैसर्गिक ओलावा कमी करून ते कोरडे आणि कमकुवत बनवते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
जास्त शॅम्पू वापरणे - अधिक शॅम्पूमुळे स्काल्पवरील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस राठ होतात.
शॅम्पू थेट स्काल्पवर ओतणे - शॅम्पू आधी पाण्यात किंवा हातात फेस करून लावल्यास केसांचे नुकसान कमी होते.
कंडिशनर स्काल्पवर लावणे - कंडिशनर फक्त केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा; स्काल्पवर लावू नका.
ओले केस जोरात घासणे - टॉवेलने केस घासण्याऐवजी हलक्या हाताने पाणी टिपा, त्यामुळे केस तुटत नाहीत.
केस पूर्णपणे न धुणे - शॅम्पू किंवा कंडिशनरचे अवशेष राहिल्यास स्काल्पमध्ये खाज, कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.
रोज केस धुणे - दररोज केस धुतल्याने नैसर्गिक तेल कमी होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार धुण्याची वारंवारता ठरवा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)