स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी रोजच्या आयुष्यात करा 'हे' छोटे बदल

किशोरी घायवट-उबाळे

दिवसाची सुरुवात सकारात्मक करा सकाळी उठल्यावर काही मिनिटं शांत बसा, खोल श्वास घ्या आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
पुरेशी झोप घ्या शरीर आणि मनाला आराम मिळण्यासाठी दररोज नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
रोज थोडा व्यायाम करा चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते आणि मूडही चांगला राहण्यास मदत होते.
आवडत्या व्यक्तींशी बोला कुटुंबीय, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी रोज थोडा वेळ काढा.
स्वतःच्या आवडीसाठी वेळ द्या वाचन, संगीत, चित्रकला किंवा तुमचा आवडता छंद जोपासण्यासाठी दिवसातून काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.
सोशल मीडियापासून ब्रेक घ्या सतत मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरण्याऐवजी दिवसातून काही वेळ स्क्रीनपासून दूर राहा.
आवडता आणि संतुलित आहार घ्या पौष्टिक आहार, पुरेसे पाणी आणि नियमित जेवण यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होते.
दिवसातील चांगल्या गोष्टी आठवा झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या २-३ चांगल्या गोष्टी आठवा किंवा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)