Happy Friendship Day 2025 : तुमच्या मित्रांमध्ये 'ही' खास लक्षणे आहेत का?
नेहा जाधव - तांबे
प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. यंदा हा खास दिवस ३ ऑगस्ट २०२५ रोजी येत आहे. | |Canva
मैत्री ही समर्पित असते स्वार्थी नसते. त्यासाठी आपल्या मित्रांच्या गुणांची पारख करा. जर तुम्हाला तुमचे खरे मित्र कोण माहीत नसतील तर ही स्टोरी तुमच्यासाठी. | |Canva
खरा मित्र हा कधीही तुमच्या मदतीसाठी तयार असतो. तो तुमच्या भावनांना समजून घेतो, आणि तुमच्या मनातील गोष्टी शांतपणे ऐकतो. | |Canva
तुमच्या दु:खात पहिला हात पुढे करणारा तुमचा मित्र असतो. तुमच्यासाठी तो कुठेही काहिही करायला तयार असतो. दरवेळी तो तुमची मदत करतो. | |Canva
केवळ दु:खच नव्हे तर तुमच्या आनंदात आनंद मानणारा हा मित्र असतो. तुमच्या आनंदी क्षणी ज्याच्या मनात ईर्षा उत्पन्न होत नाही तो खरा मित्र. | |Canva
जो तुमच्या यशात आणि तुमच्या प्रगतीला प्रोत्साहन देतो, तोच तुमचा खरा मित्र.
| |Canva
मित्र हा सावलीसारखा असतो. तुम्ही चुकत असाल, तेव्हा योग्य मार्ग दाखवणारा खरा मित्र असतो. | |Canva
तुमच्या जवळच्या कोणत्या मित्रामध्ये हे सर्व गुण आहेत? हे ओळखा आणि यंदाचा फ्रेंडशिप डे त्याच्यासोबत आनंदाने साजरा करा. | |Canva