चटपटीत कैरीची लुंजी खाल्ली का? अवघ्या १० मिनिटांत बनते; रेसिपी आहे एकदम सोपी, एकदा नक्की ट्राय करा
Kkhushi Niramish
कैरीची लुंजी हा कैरीपासून बनवलं जाणारं एक प्रकारचं लोणचं किंवा खास चटणी आहे. जी खूप चटपटीत लागते. जाणून घ्या, याची अतिशय सोपी रेसिपी-
सर्व प्रथम कैरी धुवून सालासह त्याचे तुकडे करा. | All Photo - You tube Short @Ashvini2492
एका पॅनमध्ये तेल घ्या
तेलात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या.
एक चमचा मेथी दाणे घालून ते भाजून घ्या.
त्यामध्ये किसलेला बारीक गुळ आणि सोबत लाल तिखट घाला. मिश्रण थोडे गरम करा.
यामध्ये थोडे पाणी घाला आणि काही मिनिटे वाफवून घ्या.
आता या मिश्रणात कैरीचे कापलेले तुकडे घाला आणि चांगले परतून घ्या.