पनवेलजवळची 'ही' स्थळे पाहिली का? कडक उन्हाळ्यात मिळेल गारवा आणि सुखद अनुभव

Kkhushi Niramish

उन्हाळ्यात साप्ताहिक सुट्टीदरम्यान जवळपास फिरण्यासाठी पनवेल जवळची ही ठिकाणे अतिशय उत्तम आहेत. यात सर्वप्रथम कर्नाळा किल्ला येतो. | Karnala fort - Facebook
कर्नाळा किल्ल्यावरून आसपासच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळते. हा किल्ला पनवेल पासून अवघ्या 13 किमी अंतरावर आहे. | Karnala fort - Facebook
कर्नाळा किल्ल्याच्या मार्गावरच कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. इथे पक्षांच्या १२५ ते १५० प्रजाती आढळतात. | Karala Bird Sanctuary & Karnala Fort
पनवेलपासून जवळच असलेल्या खारघर स्टेशनपासून अवघ्या ७-८ किमी असणारा पांडवकडा वॉटरफॉल हा तुम्हाला एका रम्य संध्याकाळचा अनुभव देतो. | Srushti Patil - You Tube Video
Gadeshwar Dam येथून कर्नाळा किल्ला आणि जवळपासचा परिसर दिसतो. हे डॅम पनवेलपासून अवघ्या १७ किमी. अंतरावर म्हणजेच ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. | Srushti Patil - You Tube Video
महाराष्ट्रातील नवी मुंबईतील पनवेल शहरात असलेल्या सेक्टर २, खंडेश्वर येथील खांडेश्वर शिव मंदिर हे कळंबोली सर्कलच्या अगदी जवळ आहे. मंदिरात एक सुंदर तलाव आणि बाग आहे. परिसरात हिरवीगार झाडी आहेत. यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला आल्हाददायक गारवा मिळेल. | PRAMODAM - Youtube
Mankeshwar Beach Uran पनवेल जवळील उरण येथील मानकेश्वर बीच तुम्ही पाहिले आहे का? मुंबईतील धावपळीच्या जीवनापासून तुम्हाला शांत आणि निसर्गसुंदर वातावरण येथे अनुभवता येईल. | Srushti Patil - You Tube Video
Morbe Dam हे पनवेल पासून अवघ्या ४० किमी अंतरावर आहे. येथील जलाशय, दाट हिरवीगार झाडी तुम्हाला कडक उन्हाळ्यात नेत्रसुखद अनुभव देईल. | Youtube video - mumbaika kumar