राणा दा आणि पाठक बाईंचा हा अंदाज तुम्ही पाहिलात का ? सोहळ्याचे फोटो खास तुमच्यासाठी

वृत्तसंस्था

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाचा थाट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घरोघरी पोहचलेल्या या जोडीने पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ

दरम्यान, राणादा व पाठक बाईंच्या लग्नात एकूणएक सर्व विधी व लुक, इतकंच नव्हे तर हॅशटॅग #अहा सुद्धा सोशल मीडियावर हिट ठरले

२०२२ मध्ये अक्षय्य तृतीयाला अक्षया व हार्दिकचा साखरपुडा पार पडला व आता डिसेंबरमध्ये या जोडीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे

अक्षया आणि हार्दिकने फोटो शेअर करत लिहिलं,"आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळालं आहे. तुम्ही तयार केलेल्या सकारात्मक वातावरणामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.

लाल रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठुशी, काळ्या मण्यांनी भरलेलं मंगळसुत्र, हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ असा अक्षयाचा लग्नातला लूक होता

हार्दिकने लाल रंगाचं धोतर आणि क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच त्यांच्या मुंडावळ्यादेखील आकर्षक होत्या.

हार्दिक आणि अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

हार्दिकने राणादा ही भूमिका तर अक्षयाने पाठकबाईंची भूमिका साकारली होतीसर्व फोटो अक्षया देवधर आणि हार्दिकच्या इन्स्टा हॅन्डल वरून घेतले आहेत

सर्व फोटो अक्षया देवधर आणि हार्दिकच्या इन्स्टा हॅन्डल वरून घेतले आहेत

धन्यवाद