सतत डोकं दुखतंय? 'हे' घरगुती उपाय करा आणि डोकेदुखी पळवा
किशोरी घायवट-उबाळे
डोकं सतत दुखत असेल तर काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पुरेसे पाणी प्या : शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी होते. दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे फायदेशीर ठरते.
आल्याचा चहा प्या : आलं दाह कमी करतो. आल्याचा गरम चहा डोकेदुखी शांत करण्यास मदत करतो.
डोक्याला तेलाचा मसाज करा: खोबरेल, बदाम किंवा तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज केल्याने ताण कमी होतो.
थंड किंवा गरम पाण्याचा शेक घ्या : कपाळावर थंड पाण्याची पट्टी किंवा मानेजवळ गरम शेक दिल्यास आराम मिळतो.
पुरेशी झोप घ्या : झोपेची कमतरता डोकेदुखी वाढवते म्हणून दररोज ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.
कॅफिनचे प्रमाण कमी ठेवा : जास्त चहा-कॉफीमुळे डोकेदुखी वाढू शकते, त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित ठेवा.
दीर्घ श्वसन व ध्यान करा : तणावामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी प्राणायाम व ध्यान उपयुक्त ठरते.
डोकेदुखी सतत किंवा तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)