पोटभर आणि पौष्टिक! पराठा खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

किशोरी घायवट-उबाळे

पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय - योग्य पद्धतीने बनवलेला पराठा शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण देतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतो - गव्हाच्या पिठातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे वारंवार भूक लागत नाही.
ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत - होल व्हीट पराठे शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
प्रोटीनचा चांगला स्रोत - पनीर, मूगडाळ किंवा मटार स्टफिंगमुळे पराठ्याची प्रोटीन व्हॅल्यू वाढते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर - कमी तेल आणि हेल्दी स्टफिंग वापरल्यास पराठा वजन कमी करण्यासाठीही मदत करू शकतो.
हेल्दी बनवणं अगदी सोपं - मल्टीग्रेन पीठ, भाज्या आणि कमी तूप वापरून पराठा अधिक पौष्टिक बनवता येतो.
चविष्ट आणि विविध प्रकारात उपलब्ध - पालक, बीटरूट, पनीर यांसारख्या पदार्थांमुळे पराठ्याचे अनेक हेल्दी प्रकार तयार करता येतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)