Health Tips : डिहायड्रेशनपासून बचावासाठी काकडी खा, पण ‘या' गोष्टी लक्षात ठेवा

Mayuri Gawade

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी खाणं फायदेशीर मानलं जातं.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होण्यास मदत होते.
काकडीमधून शरीराला फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक मिळतात.
उन्हाळ्यात हलकं आणि ताजेतवाने वाटण्यासाठी अनेक जण आहारात काकडीचा समावेश करतात.
काकडीतील अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर मानली जाते.
रिकाम्या पोटी किंवा रात्री उशिरा काकडी खाण्यापेक्षा योग्य वेळेत खाल्ल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
सॅलड, रायता किंवा साध्या स्वरूपात खाल्ली तरी काकडी शरीराला थंडावा देण्याचं काम करते. | All Images - AI Generated