सुंदर त्वचा हवीये? मग दररोज सकाळी प्या 'हा' हेल्दी ड्रिंक

Suraj Sakunde

आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीरासोबतच आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळं जास्तीत जास्त पोषण आहाराकडे लक्ष द्यायला हवे.

अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर हेल्दी ड्रिंक्स घेतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यासोबत स्किनसाठी फायदेशीर असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा हेल्दी ड्रिंकबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जो तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो.

या हेल्दी ड्रिंकसाठी एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक चिमुटभर हळद आणि एक चमचा मध मिसळा.

तयार झालेलं हे ड्रिंक प्या आणि त्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासात काहीही खाऊ नका.

हे ड्रिंक शरीरासोबतच चेहऱ्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.

हळद आणि मध दोन्हीही चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात. पिंपल्स, डार्क सर्कल्स आणि एजिंगपासून वाचण्यासाठी ते फायदेशीर ठरतात.

सोबतच त्वचा तेजस्वी बनते आणि शरीरातील टॉक्सिंसही बाहेर पडतात.