पावसाळा सुरू झाला! निरोगी राहण्यासाठी आजपासूनच लावा 'या' सवयी
Mayuri Gawade
पहिल्या पावसात भिजण्याचा मोह टाळा; वातावरणातील धूळ आणि प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट आणि अतिरिक्त मास्क सोबत ठेवा.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
रस्त्यावरील कापलेली फळे आणि उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा.
रोजच्या आहारात सूप, काढा आणि गरम पेयांचा समावेश करा.
घराभोवती पाणी साचत असल्यास त्वरित साफसफाई करा; डासांची पैदास रोखा.
ओले बूट आणि मोजे जास्त वेळ वापरू नका; त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
पावसाळा सुरू होताच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांकडे लक्ष द्या.
सर्दी, ताप किंवा अंगदुखीची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. | All Image : Ai Generated