Office Snacks : काम करता-करता भूक लागते? ड्रॉवरमध्ये ठेवा 'हे' ७ हेल्दी स्नॅक्स
Mayuri Gawade
ऑफिसमध्ये काम करता-करता अचानक भूक लागली की चिप्स, बिस्किटं किंवा नमकीन खाण्याऐवजी ड्रॉवरमध्ये काही पौष्टिक स्नॅक्स ठेवून द्या.
भाजलेले चणे हा ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी सोपा पर्याय असून ते डब्यात किंवा बंद पिशवीत सहज साठवता येतात.
कुरकुरीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर घरून भाजून आणलेले मखाणे थोड्या प्रमाणात खाऊ शकता.
बदाम, अक्रोड आणि काजूसारखा सुका मेवा ड्रॉवरमध्ये ठेवता येतो, मात्र त्यातील कॅलरीज लक्षात घेऊन त्याचे प्रमाण मोजून खा.
भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया किंवा इतर भाजलेल्या बिया छोट्या डब्यात ठेवून भुकेच्या वेळी थोड्या प्रमाणात खाता येतात.
संध्याकाळच्या भुकेसाठी खाकरा हा हलका आणि कुरकुरीत पर्याय ठरू शकतो, त्यामुळे तो छोट्या पॅकेटमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवता येतो.
ओट्स, नट्स आणि बिया वापरून घरच्या घरी तयार केलेला ग्रॅनोला बार गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यावर पर्याय ठरू शकतो.
कमी तेल, लोणी आणि साखर वापरून घरच्या घरी तयार केलेले पॉपकॉर्न हवाबंद डब्यात ठेवून थोड्या प्रमाणात खाता येतात.
ड्रॉवरमध्ये स्नॅक्स ठेवताना ते छोट्या डब्यांमध्ये किंवा पॅकेटमध्ये विभागून ठेवा, त्यामुळे एकाच वेळी जास्त खाणे टाळणे सोपे जाईल. | All Photo's : AI Generated