Healthy Snacks : काहीतरी चटपटीत खायचंय? स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांपासून बनवा झटपट स्नॅक्स

किशोरी घायवट-उबाळे

मखाना - तुपात किंवा कमी तेलात मखाना भाजून त्यावर चाट मसाला टाकला की हेल्दी स्नॅक तयार.
पोह्यांचा चिवडा - घरात पोहे असतील, तर त्यात शेंगदाणे, कढीपत्ता आणि आवडते मसाले घालून झटपट चिवडा तयार करा.
कुरकुरीत चण्यांचा स्नॅक - उकडलेले चणे (हरभरा), मीठ, तिखट आणि थोडे तेल एकत्र करून तव्यावर किंवा एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा. टोमॅटो आणि कांदा घालून सर्व्ह करा.
दह्याची व्हेज डिप - घट्ट दह्यात बारीक चिरलेली काकडी, बटाटा, कोथिंबीर, भाजलेली जिरेपूड आणि थोडे मीठ मिसळा. ही डिप गाजर किंवा काकडीच्या तुकड्यांसोबत खा.
झटपट ब्रेड टोस्ट - ब्रेडवर चटणी लावा आणि त्यावर टोमॅटो, कांदा किंवा काकडीचे तुकडे ठेवा. तव्यावर कुरकुरीत टोस्ट करून गरमागरम खा.
केळ्याचे हेल्दी बाइट्स - पिकलेल्या केळ्याचे तुकडे करून त्यावर थोडे शेंगदाण्याचे लोणी किंवा किसलेले सुके खोबरे घाला. गोड खाण्याची इच्छा झाल्यास हा सोपा पर्याय वापरून पाहा.
शेंगदाण्याचे चटपटीत चाट - उकडलेल्या शेंगदाण्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिसळा. झटपट तयार होणारा हा चाट चविष्ट लागतो.
ओट्स कटलेट- ओट्समध्ये उकडलेला बटाटा, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि मसाले मिसळा. या मिश्रणाची छोटी कटलेट्स बनवून तव्यावर कमी तेलात खरपूस भाजून घ्या.
स्प्राउट्स चाट - मोड आलेले मूग, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस एकत्र करा. चवीनुसार मीठ व चाट मसाला घालून चटपटीत स्प्राउट्स चाट सर्व्ह करा.