पावसाळ्यात भजी-पकोड्यांऐवजी खा 'हे' ७ हेल्दी पदार्थ; चहासोबत लागतील भन्नाट

किशोरी घायवट-उबाळे

भाजलेले मखाणे - तुपाचा हलका वापर करून मीठ-मसाला घालून भाजलेले मखाणे कुरकुरीत, हलके आणि पोटभर स्नॅक ठरतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
कॉर्न चाट - उकडलेल्या मक्यात कांदा, टोमॅटो, लिंबू आणि चाट मसाला घालून तयार केलेली कॉर्न चाट चहासोबत चविष्ट लागते.
भाजलेले चणे - प्रोटीन आणि फायबरयुक्त भाजलेले चणे भूक नियंत्रित ठेवतात आणि तळलेल्या पदार्थांना उत्तम पर्याय आहेत.
मुगडाळीचे धिरडे - भिजवलेल्या मुगडाळीचे पीठ करून तयार केलेले धिरडे हा पावसाळ्यातील गरमागरम, पौष्टिक आणि हलका स्नॅक आहे.
भाज्यांचे कटलेट - बटाटा, गाजर, बीट, मटार यांसारख्या भाज्यांचे कमी तेलात तव्यावर भाजलेले कटलेट चहासोबत खाण्यासाठी योग्य आहेत.
धान्याची भेळ - भाजलेले पोहे, चुरमुरे, शेंगदाणे, कांदा आणि कोथिंबीर घालून बनवलेली भेळ झटपट तयार होते आणि चवीलाही छान लागते.
ओट्स टिक्की - ओट्स, उकडलेला बटाटा आणि भाज्या एकत्र करून तव्यावर भाजलेली टिक्की ही पावसाळ्यातील हेल्दी आणि पोटभरीची निवड आहे.