Heart Health : रोजच्या आहारात 'या' फळांचा समावेश करा; हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर
किशोरी घायवट-उबाळे
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही फळांचा नियमित समावेश करता येतो.
सफरचंद : फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
संत्रे : व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटकांसाठी संत्र्याचा आहारात समावेश करता येतो.
डाळिंब : अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले डाळिंब हृदयासाठी उपयुक्त फळ मानले जाते.
केळी : पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाबाच्या संतुलनासाठी आहारात केळ्याचा समावेश करता येतो.
पपई : फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे पपई हा पौष्टिक पर्याय ठरू शकतो.
बेरीज : स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.
अवोकॅडो : हेल्दी फॅट्सचा स्रोत असल्याने हृदयासाठी संतुलित आहाराचा भाग होऊ शकतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)