हिमोग्लोबिन कमी आहे? रोज या ८ पदार्थांचा आहारात करा समावेश; रक्त वाढण्यास होईल मदत

Mayuri Gawade

सतत थकवा, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर शरीरात आयर्नची कमतरता असण्याची शक्यता असते.
पालक डाळ यांचे संयोजन हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
गाजर आणि बीटरूटचे सॅलड शरीराला आवश्यक पोषक घटकांसोबत आयर्नही पुरवते.
नाचणीची खिचडी हा आयर्न, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध पर्याय आहे.
काळ्या तिळाचे लाडू शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात.
डाळिंब आणि खजूराची चटणी चव वाढवण्यासोबत आयर्नचे प्रमाणही वाढवते.
मेथी, पालक आणि शेपूसारख्या पालेभाज्या नियमित खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
ड्रायफ्रुट्समध्ये आयर्न, प्रोटीन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
संतुलित आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास अशक्तपणा आणि थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. | All Photos : Pintrest