केसगळतीने त्रस्त आहात? जास्वंदाचा 'हा' घरगुती हेअर पॅक दाखवेल कमाल

Mayuri Gawade

महागड्या हेअर ट्रीटमेंट्सवर खर्च करण्यापेक्षा जास्वंदाच्या फुलांचा हा घरगुती हेअर पॅक वापरून पाहा; कमी खर्चात केसांना नैसर्गिक पोषण मिळू शकतं.
५ ते ६ जास्वंदाची फुलं आणि ८ ते १० पानं धुवून त्यात थोडं दही किंवा पाणी घालून बारीक वाटा. याची मऊ पेस्ट तयार करून हेअर पॅक बनवा.
तयार पेस्ट केसांच्या मुळांपासून ते शेंड्यापर्यंत व्यवस्थित लावा. ३० ते ४० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास चांगला परिणाम दिसू शकतो.
जास्वंदामध्ये असलेले अमिनो ॲसिड्स केसांच्या मुळांना पोषण देतात, त्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते आणि केसांची वाढ सुधारू शकते.
या नैसर्गिक हेअर पॅकचा नियमित वापर केल्यास केसांची मुळं मजबूत होतात, त्यामुळे केसगळती आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
जास्वंदातील अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कोंड्याचा त्रासही हळूहळू कमी होऊ शकतो.
नियमित वापरामुळे केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहण्यास मदत होते आणि अकाली केस पांढरे होण्याचा वेग कमी होऊ शकतो.
जास्वंदाचा हा हेअर मास्क केसांना खोलवर मॉइश्चर देतो. त्यामुळे कोरडे, निस्तेज केस मऊ, रेशमी आणि चमकदार दिसू लागतात.
रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करणारा हा घरगुती उपाय नियमित केल्यास केस अधिक दाट, लांबसडक आणि निरोगी दिसू शकतात. | All Photo : AI Generated