जास्वंदीचं तेल केसांसाठी का मानलं जातं खास? जाणून घ्या फायदे
किशोरी घायवट-उबाळे
केसांची निगा राखण्यासाठी जास्वंदीचे तेल पारंपरिक पद्धतीने वापरले जाते.
जास्वंदीच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांना मऊपणा आणि चमक देण्यास मदत करू शकतात.
टाळूला जास्वंदीचे तेल लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
नियमित तेलमालिश केल्याने टाळूला मॉइश्चर मिळते आणि केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.
जास्वंदीचे तेल केसांना कंडिशनिंग देऊन ते अधिक मऊ आणि सहज विंचरता येण्यास मदत करू शकते.
केस कोरडे आणि निस्तेज वाटत असतील, तर तेलामुळे त्यांना नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होऊ शकते.
केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठीही जास्वंदीच्या तेलाचा वापर केला जातो.
प्रत्येकाच्या केसांचा आणि त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आणि त्रास झाल्यास वापर थांबवणे योग्य ठरते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. ;नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)