'मै तेनु फिर मिलांगी...',हिना खानने केले बाल्कनीमध्ये फोटोशूट!

Swapnil S

हीना खान ही एक भारतीय अभिनेत्री आहे. जी हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करते. स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षरा आणि 'कसौटी जिंदगी की २' मधील कोमोलिका यांच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
हिना ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
हिनाने नुकतेच बाल्कनीमध्ये स्वतःचे फोटोशूट केले आहेत आणि तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
तिने या फोटोंमध्ये ट्रॅडिशनल लूक केला आहे. कानामध्ये मोठे झुमके आणि कपाळावर छोटी टिकली देखील लावली आहे.