Holi 2026 : बिहार ते कर्नाटक; गुजियापासून पुरणपोळीपर्यंत, रंगांच्या उत्सवात 'या' पदार्थांची खास मेजवानी
किशोरी घायवट-उबाळे
होळी म्हणजे रंगांचा जल्लोष आणि गोडधोडाची मेजवानी! गुजियाच्या गोडीपासून ते पुरणपोळी, मालपुआ, होलिगेपर्यंत भारतातील प्रत्येक राज्यात होळी खास पदार्थांनी साजरी केली जाते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
रंगांच्या सणात प्रत्येक राज्यात खास पारंपारिक मिठाई तयार करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्र - होळीला पुरणपोळी आणि कटाची आमटीशिवाय सण अपूर्ण मानला जातो.
बिहार व मध्यप्रदेश - साखरेच्या पाकात भिजवलेला मऊ मालपुआ रबडीसोबत सर्व्ह केला जातो. बिहारमध्ये अनारसेही प्रसिद्ध आहेत.
गोवा - गुजियासारखा दिसणारा नेऊरियोस नारळ, गुळ आणि काजूच्या सारणाने भरलेला असतो.
कर्नाटक - पुरणपोळीप्रमाणेच चण्याची डाळ आणि गुळाचे सारण भरून तयार केली जाणारी गोड पोळीला कर्नाटकामध्ये होलिगे/ओबट्टू म्हणतात.
| SimiJois
हरियाणा - केसरयुक्त गोड भात, गुलगुले आणि चुरमा हे खास होळीचे पदार्थ प्रसिद्ध आहेत.
बंगाल - डोल जात्रा आणि दूधापासून बनलेले गोड पदार्थ. मालपुआ, भापा दोई, मिष्टी दोई यांची खास चव येथे होळीसाठी प्रसिद्ध आहे.
भारतातील गोड होळी - राज्य बदलले तरी गोडधोडाची परंपरा कायम असल्याने प्रत्येक ठिकाणी होळीला वेगळी चव प्राप्त होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)