घरच्या बागेतील 'या' वनस्पती देतील तुमच्या केसांना नैसर्गिक चमक
किशोरी घायवट-उबाळे
घरच्या बागेतच दडलेलं हेअर केअरचं रहस्य - महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी नैसर्गिक वनस्पतींचा वापर करा. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
रोझमेरी - केसांची मुळे मजबूत ठेवण्यास आणि हेअर फॉल कमी करण्यास मदत करू शकते.
जास्वंद (हिबिस्कस) - केराटिन निर्मितीला चालना देऊन केस अधिक मऊ आणि मजबूत बनवण्यास उपयुक्त.
कोरफड (अॅलोवेरा) - टाळूला खोलवर हायड्रेशन देऊन कोरडेपणा आणि खाज कमी करण्यास मदत करते.
कढीपत्ता - कढीपत्त्यातील प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे कमी करण्यास मदत करतात.
पुदिना - थंडावा देत टाळूमधील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केस ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो.
नैसर्गिक हेअर ऑइल तयार करा - रोझमेरी किंवा कढीपत्ता खोबरेल तेलात उकळून घरगुती तेल बनवा.
नियमित वापर करा - या वनस्पतींचा सातत्याने वापर केल्यास टाळूचे आरोग्य सुधारून केसांना नैसर्गिक चमक मिळू शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)