चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

Swapnil S

चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर हा एक अगदी सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे. विशेष म्हणजे कोरफड आणि अंडे (Aloe vera and eggs) या दोन्ही गोष्टी तुमच्या त्वचेसाठी अतिशय पुरक आणि पोषक असतात. कोरफडीचे फायदे अनेक असून त्यात व्हिटॅमिन ई चे नैसर्गिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा ओढली जाऊन सुरकुत्या कमी होतात. त्याचप्रमाणे कोरफड व अंड्याच्या मिश्रणामुळे तुमची डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा तजेलदार दिसू लागते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी आणि त्वचेला थंडावा मिळण्यासाठी कोरफड आणि अंड्याचा फेसमास्क खूप फायदेशीर ठरतो.
बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागते. दुधामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ होते आणि मुलायम होते. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची मुळीच गरज नाही. कारण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तुम्ही हा उपाय घरच्या घरी करू शकता. | PM
नारळाचे तेल त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्वचाला मऊपणा मिळतो ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेचा सैलपणा कमी होऊन सुरकुत्या कमी होतात. | PM
लिंबामध्ये त्वचा स्वच्छ करणारे गुणधर्म असतात तर मध त्वचेसाठी पोषक असतं. त्वचेच्या आत असलेल्या कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी मधाचा उपयोग होतो. ज्यामुळे नवीन त्वचापेशी निर्माण होतात. त्वचा फ्रेश आणि तजेलदार झाल्यामुळे सुरकुत्या कमी होतात | PM
अॅव्होकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. शिवाय यातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई त्वचेसाठी उपयुक्त ठरते. अॅव्होकॅडोचा गर त्वचेत व्यवस्थित मुरतो आणि त्वचेला पोषण देतो. त्वचा दुरूस्त करून पुर्ननिर्मितीसाठी ते योग्य असते. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी उपाय करताना हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो.