पार्लरमध्ये हजारो रुपये कशाला खर्च करता? फक्त १० रुपयांत घरीच करा नैसर्गिक हेअर स्पा
Mayuri Gawade
केस कोरडे, निस्तेज आणि रफ झाले आहेत? मग घरच्या घरी करा हा सोपा हेअर स्पा.
महागड्या पार्लर ट्रीटमेंटशिवायही केसांना मिळू शकतो सिल्की आणि चमकदार लुक.
सर्वप्रथम २ ते ३ चमचे ताजा कोरफडीचा गर एका बाऊलमध्ये घ्या.
त्यात २ चमचे दही मिसळा. दही केसांना पोषण देऊन मऊपणा वाढवते.
यानंतर १ चमचा खोबरेल तेल घाला. यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.
अर्धे पिकलेले केळ बारीक कुस्करून मिश्रणात टाका.
सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत व्यवस्थित कालवून घ्या.
तयार हेअर स्पा मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा.
यानंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा. केस अधिक मऊ, सिल्की आणि चमकदार दिसू लागतील. | All Photos : Ai Generated