केमिकल कंडिशनरला म्हणा बाय! जास्वंद-अळशीच्या जेलने मिळवा सिल्की, शायनी केस

Mayuri Gawade

केस कोरडे, रफ आणि निर्जीव झाले आहेत? मग हा नॅचरल उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
जास्वंदीची फुले आणि अळशीच्या बिया एकत्र करून घरच्या घरी नैसर्गिक कंडिशनर तयार करा.
जास्वंदातील म्युसिलेज केसांना खोलवर मॉइश्चर देऊन त्यांना मऊ आणि चमकदार बनवते.
जास्वंदातील अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन सी केस गळती कमी करण्यास मदत करतात.
अळशीच्या बियांतील ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
४-५ जास्वंदीची फुले, ५-६ पाने, २ चमचे अळशी आणि २ ग्लास पाण्यापासून हे जेल तयार करता येते.
सर्व साहित्य ५ ते ७ मिनिटे उकळून मिश्रण जेलसारखे झाल्यावर गरम असतानाच गाळून घ्या.
शॅम्पूनंतर हे जेल केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावून २०-२५ मिनिटे तसेच ठेवा.
आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केस अधिक मऊ, सिल्की आणि शायनी दिसू शकतात. | All Photos : Ai Generated