मध खाल्ल्याने वजन घटतं की वाढतं? जाणून घ्या खरं कारण
किशोरी घायवट-उबाळे
मध थेट वजन कमी करत नाही, पण योग्य पद्धतीने घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करू शकतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
मध हा नैसर्गिक स्वीटनर असल्याने चहा, कोफी किंवा डिटॉक्स ड्रिंकमध्ये साखरेऐवजी मध वापरल्यास कॅलरी इनटेक कमी होऊ शकतो.
सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबू घेतल्याने पचन सुधारते आणि फॅट बर्न प्रक्रियेला मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मध मदत करतो, त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी थोडे मध घेतल्यास रात्री उशिरा होणारी खाण्याची इच्छा कमी होते.
मध आणि दालचिनी पाणी नियमित घेतल्यास फॅट मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होऊ शकते.
मध आरोग्यदायी असले तरी जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते, त्यामुळे त्याचे मर्यादित सेवन आवश्यक आहे.
मध म्हणजे वजन कमी करण्याचा जादुई उपाय नाही. पण योग्य आहार, व्यायाम आणि मर्यादित सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मध मदत करू शकतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)