हॉटेलसारखा मोकळा-लुसलुशीत भात हवा? 'या' टिप्स फॉलो करा, प्रत्येक दाणा होईल वेगळा!
Mayuri Gawade
घरचा भात चिकट, गच्च किंवा पचपचीत होतो? काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर घरच्याघरीही हॉटेलसारखा मोकळा, सुगंधी भात सहज बनवता येतो.
भात शिजवण्यापूर्वी तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा. अतिरिक्त स्टार्च निघाल्यामुळे प्रत्येक दाणा वेगळा आणि मोकळा राहतो.
तांदूळ २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे दाणे समान शिजतात, तुटत नाहीत आणि भात अधिक लांबसडक दिसतो.
मोकळ्या भाताचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण. एका वाटी बासमतीसाठी साधारण दीड ते पावणेदोन वाटी पाणी पुरेसं ठरतं.
भात शिजवताना एक चमचा तूप, तेल किंवा काही थेंब लिंबाचा रस घाला. यामुळे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि भात पांढराशुभ्र दिसतो.
भात शिजताच लगेच ढवळू नका. गॅस बंद करून ५ ते १० मिनिटे झाकून ठेवल्यास वाफ व्यवस्थित मुरते आणि दाणे अधिक मोकळे राहतात.
भात हलवताना उलथण्याऐवजी काटा किंवा फोर्क वापरा. त्यामुळे दाणे मोडत नाहीत आणि भाताची रचना कायम राहते.
हॉटेलसारखा लांबसडक आणि सुगंधी भात हवा असेल तर चांगल्या दर्जाचा बासमती किंवा लाँग-ग्रेन तांदूळ निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे.
भात जास्त वेळ शिजवू नका आणि शिजल्यानंतर ५ मिनिटे विश्रांती द्या. या छोट्या सवयीमुळे प्रत्येक दाणा मऊ, सुटसुटीत आणि परफेक्ट तयार होतो. | All Photos : AI Generated