जमिनीखाली सोन्याचा शोध कसा घेतला जातो? काय आहे तंत्रज्ञान?

Kkhushi Niramish

सोने हे सर्वात मौल्यवान धातू आहे. सोन्यापासून बनवले जाणारे दागिने आपल्याला सर्वांनाच आवडतात. तुम्हाला माहित आहे का सोन्याच्या खाणींचा शोध जमिनीखाली कसा घेतला जातो? काय आहेत त्या टेक्नॉलॉजी? चला जाणून घेऊया
जमिनीखाली सोनं आहे की नाही हे ओळखण्यासाठी ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार (GPR) या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. GPR द्वारे जमिनीतील धातू आणि इतर वस्तूंची माहिती मिळू शकते.
व्हेरी लो फ्रीक्वेंसी (VLF): जमिनीतील धातूंना ओळखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
Metal Detector उपकरणाचा देखील वापर जमीनीखाली सोनं आहे का नाही हे शोधण्यासाठी होतं.
उपकरण आणि अन्य अभ्यासांद्वारे जेव्हा जमिनीखाली सोन असल्याची खात्रीशीर माहिती मिळते. त्यानंतर खाणीत खोदकाम सुरू केले जाते.
खाणीतून मिळालेले सोने नंतर विविध यंत्राच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येते. हे सोने नंतर शुद्ध केले जाते.
भारतात सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्यात आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये आहेत. हुट्टी सोन्याची खाण ही देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)