Suraj Sakunde
ताक पिणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. ताकामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस इत्यादी घटक आढळतात.
गरमीच्या दिवसात ताक पिणं खूपच लाभदायी असतं.
ताक प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर पोटाला थंडावा मिळतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की, ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
जेवणापूर्वी ताक प्यावं की जेवल्यानंतर प्यायला हवं?
ताक तुम्ही दिवसात कोणत्याही वेळी पिऊ शकता, परंतु दुपारच्या वेळी जेवणानंतर ताक पिणं जास्त फायदेशीर ठरतं.
जेवणनानंतर ताकाचं सेवन केल्यानं गुड बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिडमुळं पचनक्रिया सुधारते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दुपारच्या जेवणानंतर १५ मिनिटांनी ताकाचं सेवन करायला हवं.
ज्यांना अपचन, ब्लोटींग किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील ते सकाळी नाश्त्यामध्ये ताक पिऊ शकतात.
आहारतज्ज्ञांच्या मते दिवसातून एक ते दोन ग्लास ताकाचं सेवन पुरेसं आहे.
रात्री जेवणानंतर ताकाचं सेवन टाळावं.