परफेक्ट मेकअपसाठी ब्लश कसा लावायचा? वाचा सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

ब्लश लावण्याआधी फेस क्लीन करून मॉइश्चराइज लावा आणि त्यानंतर हलकं फाउंडेशन किंवा बीबी क्रीम लावा. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
योग्य शेड निवडा : फेअर स्किनसाठी पिंक / पीच, व्हीटिश स्किनसाठी रोझ / कोरल आणि डस्की स्किनसाठी प्लम / ब्रिक टोनच्या शेड मेकअपला परफेक्ट लूक देतात.
ब्लश कुठे लावायचा हे ठरवा : हसल्यावर दिसणाऱ्या गालाच्या उंचावलेल्या भागावर ब्लश लावा.
ब्रशचा योग्य वापर करा: फ्लफी ब्लश ब्रश वापरा. हलक्या हाताने ब्रशवर ब्लश घेताना तो झटकून घ्या. जास्त प्रमाणात ब्लश घेतल्यास लूक खराब होऊ शकतो.
वरच्या दिशेने ब्लेंड करा : गालांच्या मध्यातून कानाकडे वरच्या दिशेने ब्लश ब्लेंड करा.
कमी प्रमाणात लावा: ब्लश जास्त लावू नका. हळूहळू बिल्ड करा म्हणजे तुमचा लुक नॅचरल दिसेल.
मेकअप सेट करा : शेवटी मेकअप सेट करण्यासाठी थोडी सेटिंग पावडर किंवा सेटिंग स्प्रे वापरा.
ब्लश लावण्याच्या या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट लूक करू शकता.
(Disclaimer: यामध्ये दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)