तुम्ही मस्कारा लावता? मग 'या' टिप्स वाचाच
किशोरी घायवट-उबाळे
डोळे स्वच्छ ठेवा : मस्कारा लावण्यापूर्वी डोळ्यांभोवतीचा मेकअप व घाण पूर्ण स्वच्छ करा. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
एक्सपायरी डेट तपासा : जुना किंवा एक्सपायरी डेट संपलेला मस्कारा वापरल्याने डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
पाणी मिक्स केलेला मस्कारा वापरू नका : पाणी मिसळलेला मस्कारा पापण्यांना नुकसान करू शकतो.
मस्काराचा जास्त थर लावल्यास पापण्या तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता असते.
झोपण्यापूर्वी मस्कारा काढा : मेकअपसह झोपल्यास डोळ्यांना खाज येऊ शकते. डोळ्यांना लालसरपणा येऊ शकतो.
मस्कारा शेअर करू नका : दुसऱ्याचा मस्कारा वापरल्यास डोळ्यांचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
मस्कारा लावताना या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे डोळे अधिक सुंदर आणि खुलून दिसतील.
(Disclaimer: या लेखात दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)